व्यवसाय भांडवलासाठी बँकेतून ओळखीतून कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहल प्रिन्स कुंभार, रा. तामजाईनगर या महिलेने ही तक्रार दिली आहे. गणेश भोसले आणि समीर शेंडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार फसवणुकीची ही घटना घडली आहे.