मस्कावद सिम या गावात पंकज प्रल्हाद बोरोले वय ४१ हा इसम आपल्या घरी होता दरम्यान हा इसम आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. या इसमाचा सर्वत्र शोध घेण्यात आला. नातेवाईकांकडे तपास केला. मात्र तो कुठेच मिळून आला नाही. सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच मिळून आल्याने सावदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.