आज दिनांक 31 जुलै रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार ज्ञजालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.