घरकुल योजनेच्या लाभार्थ्याकडून घरकुलाचा दुसरा हप्ता मंजुर करुन देण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच घेतांना घनसावंगी पंचायत समितीचा कंत्राटी गृहनिर्माण अभियंता विशाल विठ्ठलराव कनोजे याला बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गंगाधरवाडी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. विशाल कनोजे याने तक्रारदार यांच्या गावातील घरकुलाच्या लाभार्थ्यांकडून प्रती घरकुलामागे 1 हजार रुपये प्रमाणे 40 हजार रुपयाची लाच मागीतली होती.दुसरा हप्ता देण्यासाठी लाच मागितली होती.