राक्षसभूवन (ता. गेवराई) येथे आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ पसरली आहे. ज्ञानेश्वर सुभाष बल्लेवाड (वय ३२) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होताच त्यांना प्रचंड विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्यांनी जागीच प्राण सोडले. ही घटना इतकी अचानक घडली की ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.