जिंतूरात कुरेशी समाजाच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सात जण जखमी झाले, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मारहाणीत इलाही तैय्यब कुरेशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणीतील निदान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी जखमी इलाही कुरेशी यांचे वडील तैय्यब कुरेशी व कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 15 वाजता माध्यमांना प्रतिक्रिया देताना केली आहे.