नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या टेमुर्डा येथील मुख्य चौकात आज दि. १३ सप्टेंबर २०२५) पहाटे १.३० वाजता एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका १६ चाकी ट्रकने (क्रमांक यूपी ७२ सीटी ७८१७) नियंत्रण गमावले आणि तो थेट रस्त्यावरील दुभाजक तोडून बाजूच्या 'शिवकृपा मेडिकल' आणि 'तेजस्विनी क्लिनिक' या दवाखान्याच्या टिनशेडवर आदळला. या अपघातात मेडिकलच्या शेडमध्ये झोपलेल्या एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला