जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोकरावजी उईके यांनी दौरा जाहीर केला मात्र या दौऱ्यानिमित्त ते महामार्ग लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी केली त्यामुळे गाव खेड्यातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांना आली नाही म्हणून आज दि.1 ऑक्टोबर ला 12 वाजता आसाळा येथील शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.