अकलुज येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून बचत गटाचे १० लाख रुपये काढल्यानंतर गट समन्वयक मनिषा रविंद्र गवळी (रा. यशवंतनगर, माळशिरस) यांच्याकडील पैशांची बॅग अज्ञात चोरट्याने पळवून नेली. या बॅगेत ८ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम तसेच १० हजार रुपयांचा मोबाईल फोन होता. २९ ऑगस्ट रोजी दुपारी बँकेबाहेर स्कूटीजवळ ठेवलेली बॅग एका अनोळखी युवकाने उचलून नेली. गवळी दाम्पत्याने पाठलाग केला, परंतु तो फरार झाला. या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.