लातूर-:शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.यानिमित्त मनपा अधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी गंजगोलाई, सुभाष चौक,खडक हनुमान,तेली गल्ली, सिद्धेश्वर मंदिर मार्गाची चालत जाऊन पाहणी केली.दरवर्षी मनपाच्या वतीने शहरात १५ ठिकाणी व विमानतळ परिसरात मूर्ती संकलन केंद्र उभारले जाते. यापैकी खंदाडे नगर,शासकीय कॉलनी, बांधकाम भवन येथील मूर्ती संकलन केंद्र परिसराचीहीखानसोळे यांनी पाहणी केली.