अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, हॉटेलमधील कर्मचारी फ्राय पॅनमध्ये फास्ट फूड तळत असताना अचानक आगीचा भडका झाला आणि आग पसरली.सदर फास्ट फूड हॉटेल मधील ०२ डीप फ्रिजर, ०६ टेबल, २४ फायबर खुर्चा, किचन मटेरियल, PUP स्ट्रक्चर, लाईट, फॅन, फ्रिज - १, सोफा सेट, इत्यादी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.