मोहाडी तालुक्यातील धोप येथे दोन आरोपींनी एका युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 24 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. यातील फिर्यादी गुंजन शिवदास सपाटे हा आपल्या मोटरसायकलने जात असता यातील आरोपी अतुल चामट व रोशन चामट यांनी फिर्यादीला अडवून तू माझ्या बहिणीला काय बोललास असे म्हणत दोन्ही आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारून जखमी केले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.