पालघर जिल्हा परिषदे मार्फत कार्यरत पदाधिकारी खाते प्रमुखांच्या दैनंदिन कामकाजासाठी 12 नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रांगणात या वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आदींसह जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.