वसई येथे एका शाळकरी मुलाच्या अंगावर पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत शाळकरी मुलाला दुखापत झाली. सुदैवाने त्याच्या खांद्यावर बॅग असल्याने थांब कोसळल्या नंतर तो थोडक्यात बचावला आहे. शाळकरी मुलाच्या अंगावर पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.