प्रकाश नगर येथील काका गणेश उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापित श्री गणरायांच्या आरतीला आमदार अमित देशमुख उपस्थित असताना, एक वेगळाच प्रसंग उलगडला. कु. अनुष्का अनिल साळुंखे, कु. नंदिनी गजानन साळुंखे आणि कु. सृष्टी सतीश साळुंखे या विद्यार्थिनींनी आमदार अमित देशमुख यांना इंग्रजीतून आभाराचे पत्र लिहून दिले. त्यातील एक पत्र आमदारांनी तेथेच मोठ्याने वाचून दाखवले.