डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अज्ञात आरोपींनी एका महिलेला तब्बल १७ लाख २० हजार २३० रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला अज्ञात नंबरवरून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याचे भासवले. तिच्या नावावर काढलेल्या सिमकार्डवरून अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगून तिच्यावर पोलिस कारवाई होणार असल्याची भीती दाखवली. अटक टाळण