औसा -शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांचा प्राध्यापक राजेंद्र लोदगेकर, अनंतराव दोरवे, किशोर कसबे, संतोष पटनुरे, मच्छिंद्र कलवले तसेच वाहतूक संघटनेचे उत्तमराव लोंढे व औसा येथील शिंदे गट शिवसेनेच्या यांच्या वतीने आज दि. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता लातूरतील संपर्क कार्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची "फकीरा" ही कादंबरी आणि भारताचे संविधान प्रदान करून सत्कार करण्यात आला. हा सत्कार शिवसेना जिल्हा कार्यालय, लातूर येथे करण्यात आला.