मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मुंबईतील विरार (पूर्व) येथून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कुटुंबासोबत व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास होती. दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी आई-वडील घराबाहेर गेले असता मुलगी घरी एकटी होती. दुपारी परतल्यावर ती घरात आढळून आली नाही.