लातूर : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील पावणे दोनशेंहून अधिक कर्मचारी बांधव - भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.