प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्तीभाव व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील मशिदींमध्ये कुरआन पठण, नाते-शरीफ पठण, विशेष नमाज व धार्मिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. रंगीबेरंगी झेंडे, फुलांच्या सजावट केलेली वाहने, धार्मिक जागर आणि इस्लामी गीतांमुळे वातावरण भारावून गेले. डोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.