जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, उपलब्ध निधीच्या ३० टक्के रक्कम खर्चासाठी आली असून पुढील द