आज ४ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी साडे बारा वाजता अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आज तपोवन येथील कृष्ण नगर पंचशील चौक परिसरात जोरदार स्वच्छता व आरोग्य मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरी आरोग्य केंद्र क्र. १, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. पूर्णिमा उघडे आणि आरोग्य निरीक्षक हैदर अली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात आल्या