पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, यामुळे नागरिकांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बोईसरचे आमदार विलास तरे यांनी केली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार विलास तरे यांनी याबाबतचे निवेदन दिले.