शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कारंजा बहिरम शेत शिवारात आज दिनांक 24 ऑगस्टला दुपारी दोन ते अडीच वाजता चे दरम्यान अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे 38 ते 40 वर्षे वय असलेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे मृतदेहाची अवस्था पाहता कळते. शिरजगाव पोलिसांची टीम घटनास्थळावर पोहोचली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे