एसटी बसमधून प्रवास करताना एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या पर्समधून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि ८०० रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गीता रविंद्र माने (वय ७२, रा. वाफोली-टेंबवाडी, बांदा) असे त्यांचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून गुरुवार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दिली.