संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नाट्यसम्राट आणि एकेकाळी नाट्य क्षेत्रामध्ये मोठा दबदबा असणारे व्यक्तिमत्व स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मगावी आणि जन्म ठिकाणी भाडळे, ता. कोरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात अरविंद तारळकर आणि माजी सरपंच अनिरुद्ध तावरे यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या उपस्थितीत तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. भाडळे खोऱ्यातील ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे यावेळी उपस्थित होते.