सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वा.नागपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. रवीभवन येथे झालेल्या या बैठकीत पंधरा टक्के आरक्षण व एकरकमी रक्कम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बावनकुळे यांनी शिष्टमंडळाशी आपुलकीने संवाद साधत मागण्यांचे गांभीर्य मान्य केले. तसेच सोमवारी पुनर्वसन मंत्र्यांसोबत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.