महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुढीपाडव्या मेळाव्या संदर्भात वाडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बावीस चोरी समीर मोरे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात नियोजन करण्यात आले व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या बैठकीस उपस्थित होते.