चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पती-पत्नी दुचाकीने गेले होते. रात्रीच्या सुमारास गणपतीचे दर्शन घेऊन पत्नीसह घरी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना 6 सप्टेंबर रोजी रात्री 3 वाजताच्या सुमारास भुयार येथील सम्राट ढाब्याजवळ घडली. संजय खेताट रा आझाद चौक भिवापूर असे घटनेतील मृतक पतीचे नाव असून जयश्री संजय खेताट असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे.