आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कुरळपूर्णा येथे दिनाच्या खोलीत ठेवलेला मोबाईल गावातीलच इसमाने चोरून नेला असल्याची तक्रार दिनांक 24 ऑगस्टला सकाळी 11:56 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला येथील सुरेंद्र बबनराव गुडसुंदरे यांनी दाखल केली. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी राजेश विठ्ठल धाकडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे