चोपडा तालुक्यात अकुलखेडा हे गाव आहे. या गावात गायत्री राकेश पावरा वय १ वर्ष ही बालिका खेळत असताना पाण्याच्या टाकीत बुडाली. हा प्रकार निदर्शनास येताच तिला उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.