गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कपिल वस्तू नगर येथील गणपती मंडळ परिसरात चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणपती मंडळाजवळ असताना त्यांना जोरजोराने भांडणाचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून त्या मंडळाजवळ पोहोचल्या असता आरोपी संतोष राजेश बन हा दुचाकी मोपेडवरून मंडळात आला व हातात लोखंडी धारदार चाकू घेऊन जखमीवर हल्ला केला.पहिल्या वारावेळी जखमीने हात आडवा केला असता त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने पुन्हा वार करून जखमीच्या छातीत भोसकले....