दिनांक 4 सप्टेंबर रोजी शाहूपुरी येथे घरपोडीची झाली होती, याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने, शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने या संदर्भात माहिती घेऊन, आरोपीचा शोध घेत असताना, गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सदरचा संशयित आरोपी हा मुंबई या ठिकाणी आहे, त्यानुसार शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंबईत जाऊन, त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर घरफोडीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.