सेनगाव तालुक्यातील कवरदरी या ठिकाणी वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कवरदरी येथील रहिवासी असलेले शेतकरी ज्ञानेश्वर अश्रुजी कुंडगर यांच्या शेतातील गोठ्यावर आज पहाटेच्या सुमारास वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाला असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सदर शेतकऱ्यांच्या वतीने आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आली आहे. कवरदरी या ठिकाणी विजांच्या गडगडाचा सह सुरू असलेल्या पावसात ही दुर्घटना घडली आहे.