महागाव तालुक्यातील दहिसावळी येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी विपुल घोरपडे यांच्या घरी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. आज दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान भर पावसात माजी मंत्री देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी बोलताना देशमुख यांनी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, तसेच कापूस आणि इतर पिकांना योग्य भाव मिळावा, अशी मागणी केली.