कामठी तालुक्यातील बस स्टँड चौकातून ट्राफिक पोलिसांनी तब्बल 20 किलो गांजा जप्त केला आहे. गांजा तस्कर हा गांजा मध्य प्रदेश येथून छत्तीसगड येथे विकायला घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. ट्राफिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कार्यवाही करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपींचे नाव मध्य प्रदेश निवासी अभिषेक लोधी व आयुष शर्मा असे सांगण्यात आले आहे आरोपींकडून गांजा व दुचाकी वाहन असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.