बीडमध्ये आर.सी.सी. बांधकाम कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अलीमोद्दीन गयासोद्दीन पटेल आणि जिल्हा सचिव मोईनोद्दीन फारुक मोमीन यांनी केले. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता. संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी विनंती करण्यात आली. कामगारांना ९० दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांकडून तात्काळ उपलब्ध करून द्यावे.