मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या 25 ते 30 वर्षापासून आदिवासी समाज वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होता.या गावांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा सुरू होती,मात्र वनविभागाने हे अतिक्रमण काढल्याने शाळा देखील निष्काशीत करण्यात आली आहे. माळेगाव मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेची शाळा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी आज दुपारी जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली.