अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी पुसद तहसील कार्यालय परिसरामध्ये साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. याबाबत आज खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.