अकोला पोलीस दलातर्फे गणेशोत्सव 2025 संदर्भात आढावा बैठक पोलीस लॉन, राणीमहाल येथे पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अध्यक्षस्थानी होते. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जावडे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांची उपस्थिती होती. बैठकीत सुरक्षा, वाहतूक, अग्निसुरक्षा, महिला सुरक्षा, ध्वनीप्रदूषण नियंत्रण याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. गणेश मंडळांनी स्वयंसेवक नेमणे, सीसीटीव्ही बसवणे,