शेतकऱ्यांनी घामाचे शिंतोडे उडवून, उन्हातान्हात मेहनत करून उत्पादित केलेले धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर पडून सडत आहे. अहेरी विभागातील सर्व पाचही तालुक्यांतील (एटापल्ली,भामरागड,मूलचेरा,अहेरी,सिरोंचा)खरेदी केंद्रांवर मागील अनेक महिन्यांपासून लाखो क्विंटल धान पडून आहे. सततच्या पावसामुळे या धानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ते खाण्यायोग्य राहिलेले नाही