चोपडा तालुक्यात वर्डी हे गाव आहे. या गावाच्या फाट्यापासून ते वडती फाट्या दरम्यान अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दुचाकी द्वारे मगन जगन बारेला वय २५ व रगन जगन बारेला वय १८ हे दोघे भाऊ जात होते. त्यांना चार चाकी कार क्रमांक एम. एच.०४ एच.एफ.८२९६ वरील अज्ञात चालकाने धडक दिली या अपघातामध्ये दोघे दुचाकी स्वार तरुण ठार झाले तेव्हा या अपघात प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.