आज बुधवार तीन सप्टेंबर रोजी पुंडलिकनगर पोलिसांनी माहिती दिली की दोन सप्टेंबरला रात्री 11 वाजता फिर्यादी विवेक शाम बत्तीशे वय 31 वर्ष राहणार शांतीपुरा छत्रपती संभाजीनगर यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जनसेवा हॉटेल समोर तीन अज्ञात आरोपींनी त्यांना फायटरने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे, याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कोळेकर हे पुढील तपास करीत आहे.