नांदेड शहरातील अनाधिकृत बॅनरवर महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आज प्रत्यक्ष दिसून येत आहे. आज रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूस जिल्हा मध्यवर्ती बँके समोर लावण्यात आलेले बॅनर अर्धे तुटून रस्त्यावर पडले होते पण तेथून जाणाऱ्या वाहतूक पोलिसांनी वेळीच प्रसंगावधानता दाखवत ते अर्धवट पडलेले बॅनर रस्त्याने ये जा करण्यासाठी अडचण होत असल्याचे पाहताच आपली दुचाकी थांबवून पडलेले बॅनर बाजूला करून यामुळे होणारा