आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजता अमरावती शहराचे नूतन पोलिस आयुक्त श्री.अरविंद चावरिया यांचे अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हार्दिक स्वागत केले.यावेळी त्यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी, एम.डी. ड्रग्सच्या अवैध व्यापारावर आणि इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून जनतेच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त चावरिया यांच्या कार्यशैली आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.