बीड शहरात डीजेवर बंदी असताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी डीजेच्या संदर्भात नियमावली घालून दिली असतानाही शासकीय नियमाचे उल्लंघन करत शहरातील पेठ बीड भागात सर्रासपणे डीजे चालवण्याचा प्रकार घडला होता ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पेठ बीड पोलिसांनी तब्बल 19 डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दहा डीजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत तब्बल एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पेठ बीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली.