– ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणांनी आज पुणेकरांनी गौराई व सात दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील विविध मंडळे, तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदी घाट, कृत्रिम तलाव तसेच महापालिकेने उभारलेल्या विसर्जन केंद्रांवर भक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांचा निन