हायकोर्टामध्ये वकील असलेल्या आणि उल्हासनगर परिसरातील कॅम्प क्रमांक चार येथील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोर असलेल्या रोमा अपार्टमेंट इमारतीत राहणाऱ्या सरिता खानचंदानी नावाच्या वकील महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी घडली आहे.सरिता यांनीनदी प्रदूषण,बेकायदेशीर होर्डीग,ध्वनी प्रदूषण आणि कर्कश आवाजा विरोधात लढा दिला होता. मात्र अचानक टोकाचे पाऊल काय चाललय याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नसून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.