खुलताबाद येथे ईद मिलाद-उन-नबीचा सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. दरगाह हजरत बाईस ख्वाजा रह. येथे पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांचे पवित्र पैरहन तसेच दरगाह बाबा बुरहानोद्दीन गरीब रह. येथे मु-ए-मुबारकचे दर्शन घेण्यासाठी तब्बल ६ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत अशी माहिती दर्गा कमिटीकडून सांयकाळी सात वाजता देण्यात आली.