डोंबिवलीत 4 वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या 24वर्षाच्या मावशीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. रात्री झोपेत असताना चार वर्षाच्या चिमुरडीला सरपंच झाल्याने ती रडू लागली त्यानंतर तिच्या मावशीने तिला मिठी मारली तेव्हा तिला देखील सर्पदंश झाला. तातडीने शास्त्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला आहे. एक महिन्यावर लग्न येऊन ठेपलेले असताना 24 वर्षाच्या तरुणीचा आणि त्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.